कोल्हापूर :- कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडवर 392 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सदरील आरोपपत्र कोल्हापूर पोलीस आणि एसआयटीने यांनी दाखल केले असून न्यायालयाने हे आरोपपत्र स्विकारलं आहे.
समीर गायकवाडला कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. समीर गायकवाडची न्यायालयीन कोठडी संपण्यापूर्वी पोलिसांनी आज 392 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.
यादरम्यान, काही महत्वाचा मुद्देमालासह काही महत्वाचे तपशिल पोलिसांनी यात नमूद केले आहेत. त्यात समीरच्या मोबाईल संभाषणाची सीडी, काही धार्मिक पुस्तक आणि पानसरे यांच्यावर जी गोळी झाडली होती, त्याच्या तपशीलाचा समावेश आहे. तसंच यामध्ये 77 साक्षीदारांचा आणि नातेवाईकांचा जबाबाचाही समावेश करण्यात आला आहे.