पांगरी (गणेश गोडसे) :- 31 अक्टोम्बर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या ग्रांमसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युंनियनने सुरू केलेल्या लढयास यश येत नसल्यामुळे राज्य ग्रामसेवक युनियनने लढा तिव्र करत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर उद्या 14 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण गळ्गुंडे व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक पेन्शन योजनेचे राज्य निमंत्रक राहुल गरड यांनी दिली.
डी.सी.पी.एस.धारकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य स्तरावर सर्व पद्धतीने प्रयत्न करण्यात आले.राज्यातील सर्व संवर्गाच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन स्थापन करण्यात आली असून त्यांच्या अंतर्गत राज्यातील सर्व संवर्गांनी एकत्रित येत उद्या नागपुर हिवाळी अधिवेशनावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.नागपूर येथील यशवंत क्रीडा संकुलावरून सकाळी अकरा वाजता मोर्चास सुरुवात होणार आहे.या मोर्चात राजी ग्रामसेवक युनियनच्या सर्व पदाधिकारी,व डी.सी.पी.एस.धारकांनी सक्रिय सहभागी व्हावे आसे आवाहन राज्य अध्यक्ष एकनाथ ढकाने,राज्य चिटणीस प्रशांत जामोदे यांनी केले आहे.यावेळी राज्य निमंत्रक राहुल गरड,जिल्हा उपाध्यक्ष अंकुश काटे,बार्शी तालुका अध्यक्ष अनिल बारसकर,सचिव तात्या साठे आदी उपस्थित होते.