उस्मानाबाद :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प, उस्मानाबादअंतर्गत  पाटोदा विभागातील ककासपूर गावातील अंगणवाडी केंद्रातील मदतनीस एक रिक्त पदासाठी शासननिर्णय व नियमाप्रमाणे, अटी, शर्ती, गुणदान, पध्दतीच्या अधिन राहून अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी सबंधीत गावातील पात्र महिलाकडून विहित नमुन्यात अर्ज प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत, दि.19 डिसेंबर पर्यत सादर करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प,उस्मानाबाद यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.  
 
Top