मुंबई :-  मनसे-भाजपच्या सहमतीने व शिवसेनेच्या सशर्त पाठिंब्यामुळे मुंबई महानगरपालिकेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.
    मुंबई महानगरपालिकेच्‍या सभागृहात शिवसेना आणि मनसेने स्मार्ट सिटीसंदर्भातल्या उपसूचना मांडल्या. या उपसूचनांना मनसे आणि भाजपने पाठिंबा दिला तर शिवसेनेच्या उपसूचना मान्य झाल्या तरच पाठिंबा दिला जाईल, अन्यथा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने विरोध दर्शवला आहे. तर राष्ट्रवादीने मात्र स्मार्ट सिटीबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. या सगळ्या गोंधळात स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
 
Top