तुळजापूर :- बारुळ (ता. तुळजापूर) येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेमार्फत सोमवार रोजी परिसरातील उद्योग भेट या उपक्रमांतर्गत परिसरातील चालणा-या लहान-लहान उद्योगांना भेटी देण्‍यात आल्‍या.
     प्रियदर्शनी नगर येथे झाडू निर्मितीचा मोठा वर्ग आहे. या उद्योगाविषयी माहिती घेताना या झाडूची निर्मिती, विक्री फायदा या सर्व गोष्‍टीची माहिती विद्यार्थ्‍यांना देण्‍यात आली. परिसरातील कुटीर उद्योगाचे विद्यार्थ्‍यांना ज्ञान व्‍हावे, या उद्देशाने हा उपक्रम घेण्‍यात आला. या उपक्रमासाठी श्रीमती क्षिरसागर एम.एम. व श्रीमती पौळ यांनी काम पाहिले.
 
Top