उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची उस्मानाबाद जिल्ह्यासाठीची एक दिवशीय कार्यशाळा शुक्रवार, दिनांक 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दुपारी एक वाजता होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
        राजपत्रित  अधिकारी महासंघाच्या वतीने राज्याच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त शासन प्रशासनासाठी ‘पगारात भागवा’ अभियान सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून उस्मानाबाद येथे ही कार्यशाळा होत आहे. याशिवाय, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या आणि त्यांच्या पाठपुराव्यासंदर्भातही या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष डॉ. एन. आर. शेळके आणि डॉ. उत्तमराव शेळके, संघटन सचिव डॉ. रत्नाकर पेडगावकर आणि डॉ. सुभाष मद्रेवार, महिला सहचिटणीस डॉ. जयश्री गोरे, सहचिटणीस इंजिनिअर बाळासाहेब शेलार आणि एकनाथ पावडे यांच्यासह राज्य संघटक डॉ. मधुकर गिरी, मधुकर डोईफोडे आणि प्रल्हाद जावळे हे पदाधिकारी येणार आहेत.

 
Top