तुळजापूर :- पोलीस पाटील दिनानिमित्त गुरूवार, दि. 17 डिसेंबर रोजी तुळजापूर येथे पोलीस पाटलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तुळजापूर येथील पोलीस संकुल सभागृहात गुरूवारी दुपारी 1 वाजता मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष हारूण पटेल (काझी), मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा सचिव धनंजय गुंड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिनकर पाटील, आण्णासाहेब कोळेकर, राहुल वाकुरे, बालाजी खरात, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जिल्हास्तरीय मेळाव्याला जिल्ह्यातील पोलीस पाटीलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम पाटील यांनी केले आहे.