उस्मानाबाद :- राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमे अंतर्गत पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, दै. यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना मराठवाडा विभागस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
यापूर्वी सोनवणे यांना कै. अनंतराव भालेराव स्‍मृती पुरस्‍कार, समर्थनल मानवी हक्‍क वार्ता पुरस्‍कार, राजमाता जिजाऊ स्‍वावलंबन उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार मिळालेले आहेत. सदरील विभागस्‍तरीय पुरस्‍काराचे स्‍वरुप एक लाख रुपये व स्‍मृतीचिन्‍ह असे आहे. सदरील पुरस्‍कार जाहीर झाल्‍याबद्दल सोनवणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
Top