उस्‍मानाबाद -: मध्‍यवर्ती जिजाऊ जन्‍मोत्‍सव समितीच्‍या २०१६ ची कार्यकारिणी निवड व उत्‍सवाची रुपरेषा ठरविण्‍यासाठी समितीची बैठक डॉ. सुभाष वाघ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीच्‍या अध्‍यक्षपदी अग्निवेश शिंदे यांची तर कार्याध्‍यक्षपदी जयराज खोचरे यांची सर्वानुमते निवड करण्‍यात आली. 
      उर्वरित कार्यकारिणीमध्‍ये रोहित बागल (कोषाध्‍यक्ष), प्रसाद देशमुख (संघटक), अभिजित पतंगे, मयुर काकडे (उपाध्‍यक्ष), बाळासाहेब खोचरे (सचिव), मनोज सरडे (सहसचिव), गणेश उंबरे (सहसंघटक) यांच्‍या निवडी करण्‍यात आल्‍या.
    यावेळी बैठकीत यंदाच्‍या जिजाऊ जन्‍मोत्‍सवानिमित्‍त प्रतिवर्षाप्रमाणे विविध क्षेत्रामध्‍ये विशेष योगदान दिल्‍याबद्दल 'जिजाऊ पुरस्‍कार', 'शहाजीराजे क्रीडाभूषण पुरस्‍कार', 'राजर्षी शाहू समाजभूषण पुरस्‍कार', तसेच 'कर्मवीर मामासाहेब जगदाळे आदर्श शिक्षक पुरस्‍कार' या पुरस्‍कार निवडीबाबत विचार विनिमय करण्‍यात आला. यंदाच्‍या उत्‍सवानिमित्‍त पुरस्‍कार वितरण तसेच रक्‍तदार शिबीर आयोजित करण्‍याच्‍या निर्णय घेण्‍यात आला. 
       बैठकीला प्रा. भालचंद्र जाधव, प्रा. रवि निंबाळकर, प्रा. रवि शितोळे, महेश मुंडे, प्रा. वैजिनाथ खोसे, विजय देशमुख, जयदिप दळवे आदीजण उपस्थित होते.
 
Top