तुळजापूर : काक्रंबा (ता. तुळजापूर) येथे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते शिधापत्रिका नसलेल्या ११५ कुटूंबांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषेदचे अध्यक्ष अॅड. धिरज पाटील, उपविभागीय अधिकारी चव्हाण, तहसीलदार काशिनाथ पाटील, पंचायत समिती सभापती प्रकाश पाटील आदिंची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, काक्रंबा येथील ७५४ कुटूंबातील ३८७१ व्यक्तींना अन्नसुरक्षेचा लभ देण्यात येत असुन दुकानदारांनी सर्वांना व्यवस्थित धान्य वाटप करावे. त्यावर पुरवठा अधिका-यांनी लक्ष ठेवून गरीबांना व्यवस्थित व योग्य दराने धान्य वाटप होतेय की नाही याची शहानिशा करावी. याच कार्यक्रमात आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या वारसांना श्रीमती सिमा विद्यासागर क्षिरसागर, सुरेश कोकरे यांना मान्यवरांच्या हस्ते १ लाख रूपयांची मदत करण्यात आली.
कार्यक्रमास सरपंच सौ. सविता झाडे, शहाजी देवगुंडे, उमेश पाटील, महेश सुरवसे, शाम ढेरे, व्यंकट झाडे, शिरगिरे, अशोक कंदले, प्रभाकर घोगरे, शिवाजी पाटील, माणिक मदने, अर्जुन कोचेकर, अब्दुल शेख, रविंद्र काळे, वामनराव पांडागळे आदिंची उपस्थिती होती.