उस्मानाबाद :- दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाणीटंचाई आणि चाराटंचाईवर मात, हाताला काम, अन्न सुरक्षा आणि जलयुक्त शिवार अभियान अशा पंचसूत्रीच्या माध्यमातून काम करीत आहे. या दुष्काळमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घोषणापत्र तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दुष्काळी परिषदेचे आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उद्धव घुगे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, समाजकल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे, सर्व उपविभागांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या सह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे या आपत्तीचा सर्वांनी मिळून सामना करणे गरजेचे आहे. गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत विविध विभागांची यंत्रणा दुष्काळाशी मुकाबला करीत आहे. तसेच शेतकरी व सर्वसामान्य वर्गासाठी झटत आहे. आपण करीत असलेले हे काम त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्याशी थेट संवाद साधा, असे आवाहन त्यांनी केले. शासन लोकांच्या पाठीशी आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून द्या. विविध विभागांमार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम होत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारी अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे अनुभव या लोकांपर्यंत घेऊन जा, अशा सूचना त्यांनी केल्या. शासन यंत्रणांनी केलेले काम लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी सकारात्मक पद्धतीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
दुष्काळाशी सामना करताना प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सर्वच पातळीवर काम व्हायला हवे, लोकांना दिलासा मिळायला हवा, असेही डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.
पाणीटंचाई आणि चाराटंचाईचा मुकाबला, रोजगार हमी योजनेची कामे, अन्न सुरक्षा योजना तसेच जलयुक्त शिवार अभियान अशा पंचसूत्रीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी कृती आराखडा उपविभागनिहाय तयार करायचा आहे. पाण्याची उपलब्धता, कोठून उपल्बध होणार, पर्यायी व्यवस्था, टॅंकरची फीडिंग सेंटर्स याचा अंतर्भाव या आराखड्यात असावा, तसेच शहरी व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र आराखडा बनविण्याचे निर्देशही त्यांनी तहसीलदारांना दिले.
चाराटंचाई लक्षात घेऊन चारा छावण्यांवरील शेतकऱ्यांना ॲझोला निर्मिती आणि हायड्रोफोनिक्स तंत्राने चारानिर्मितीचे प्रशिक्षण द्या, चारा छावण्या्ंवर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्यांच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना करुन द्या, संबंधीत सर्व शेतकऱ्यांना कृषी गटाचे सदस्य करुन घ्या, चांगल्या पद्धतीने छावणी कशी चालवावी, यासाठी प्रशिक्षण द्या, असे निर्देश त्यांनी दिले. ज्या चारा छावण्या चांगल्या पद्धतीने सुरु आहेत, जनावरांची चांगल्या पद्धतीने निगा व देखभाल केली जात आहे,त्यांना अधिकाधिक मार्गदर्शन करा. पशुपालकांची गटनिर्मिती करा, तेथील उपलब्ध होणाऱ्या दुधापासून खवा व दुग्धजन्य पदार्थनिर्मितीसाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी पशुसंवर्धन व कृषी विभागाला दिल्या.
चारा छावणीत ज्या शेतकऱ्यांची जनावरे आहेत, त्या प्रत्येक शेतकऱ्यांचे बॅंकेत खाते नसेल तर त्यांची खाती उघडून घ्या, त्यांना बॅंकेच्या कामकाजाची माहिती द्या, शेतकरी गटनिर्मितीची माहिती द्या,थेटपणे लोकांपर्यंत पोहोचा, अशा स्पष्ट सूचना डॉ. नारनवरे यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतींना सध्या एक लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींना ग्रामस्तरावर विविध कामे करावयाची आहेत. सध्या शेतकरी आत्महत्येसारख्या काही दुर्दैवी घटना जिल्ह्यातील काही भागात घडल्या आहेत. त्या पार्श्वभीमीवर गावातील सर्वाधीक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने निवडून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतोय की नाही, अन्न् सुरक्षा योजनेचा लाभ मिळतोय का, याची माहिती घ्या, असे निर्देश डॉ. नारनवरे यांनी दिले आहेत. ज्या शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या त्या प्रकरणात मदत झाली की नाही, त्यांच्या मुलांना स्वयंरोजगार-शिक्षण यासंदर्भात काही मदत मिळाली का, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व इतर योजनांचा लाभ त्यांना मिळाला की नाही, याबाबत खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळतोय की नाही, यासाठी पुरवठा विषयासंदर्भात सर्व ग्रामपंचायतींची विशेष ग्रामसभा बोलावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, समाजकल्याण आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने सामूहिक विवाहासाठी अशा कुटुंबातील विवाहयोग्य मुलामुलींना प्राधान्य द्यावे, त्याचबरोबर, शेतकरी कुटुंबातील किंवा कोणत्याही गरीब कुटुंबातील विवाहयोग्य मुलामुलींचे विवाह या सामुहिक विवाह योजनेत लावून देण्यात येतील. नागरिकांनीही यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वारकरी हे शेतकऱयांपर्यंत जाऊन त्यांचे प्रबोधन करणार आहेत. त्याशिवाय, जिल्ह्यात बळीराजाचा जाणता राजा- छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर आणि त्यांच्या शेतीविषयक धोरणांची माहिती शेतकऱ्यांना करुन देणाऱ्या व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
दरम्यान, या परिषदेत चाराटंचाई विषयावर भूमचे उपविभागीय अधिकारी श्री. पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पाणीटंचाई व त्यावरील उपाययोजना यावर उपविभागीय अधिकारी (कळंब) सचिव बारवकर, रोजगार हमी योजना यावर उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, अन्न सुरक्षा योजना- जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. देशमुख, बळीराजा चेतना अभियान- उपविभागीय अधिकारी (उस्मानाबाद) तेजस चव्हाण, खवा क्लस्टर- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, जलयुक्त शिवार अभियान यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक उपजिल्हाधिकारी श्री. लाटकर यांनी केले.