परंडा : मोटासायकल व कारच्या झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोघा सख्खा भावांचा मृत्यू झाला. ही घटना घटना सोमवार दि. १४ रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास परंडा-बार्शी रस्त्यावरील भैरवनाथ तालिम संघासमोर घडली आहे.
विठ्ठल श्रीराम सुतार (वय ४०) व शिवाजी श्रीराम सुतार (दोघे रा. खानापूर, ता. उस्मानाबाद) असे अपघातात मरण पावलेल्या भावांचे नावे आहेत. सुतार बंधू हे सोमवारी एका लग्न कार्यासाठी शेळगाव येथे गेले होते. लग्न झाल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून खानापूर गावाकडे निघाले होते. दरम्यान बार्शी-परंडा रस्त्यावर भैरवनाथ तालिम संघासमोर स्विफ्ट कार (क्र. एम. एच. १२/डीई/५२४८) व मोटारसायकल क्रमांक (एम. एच. २५/व्ही./२१८५) या दोन वाहनांची समोरा समोर धडक झाली. या धडकेत दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले. तर स्विफ्ट कारचा चालक गंभिर जखमी झाला आहे. त्यांना तातडीने ग्रामीण रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेतुन पुढील उपचारासाठी बार्शी येथे नेहण्यात आले. वाटेतच या दोघांचाही मृत्यू झाला.