पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी ता.बार्शी पोलिस ठाण्याचे विभाजन करून बार्शी तालुका पोलिस ठाण्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असतानाच पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गांवांनी नव्याने होणार्‍या तालुका पोलिस ठाण्याच्या कक्षेत जाण्यास विरोध असून कांही ग्रांमपंचायतिणी तर ग्रामसभेत लेखी ठराव घेऊन ते विरोधाचे ठराव संबंधित कार्यालयाकडे पाठवून दिले आहेत.गावांच्या मागनीनुसार प्रशासन फेरबदल करणार का?का आहे त्या आराखड्याप्रमाणेच नवीन पोलिस ठाण्याची रचना ठेवणार याकडे संबंधित गावातील जनतेचे डोळे लागून राहिले आहेत.
      वैराग व पांगरी पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन तालुका पोलिस ठाण्याची निर्मिती व्हावी अशी जुनी मागणी होती.त्यानुसार शासणाने नूतन पोलिस ठाण्यास मान्यता देऊन पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आगळगांव औट पोस्ट मधील बहुतांशी गावे तालुका पोलिस ठाण्यास जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र ज्यासाठी नवीन पोलिस ठाण्याची मागणी होत होती व ज्या कारणासाठी नव्याने पोलिस ठाणे निर्माण करावे लागले तो उद्देश साध्य होत नसल्याचे जंनतेमधून बोलले जात आहे.पांगरी पोलिस ठाण्याची हद्द पन्नास किमी अंतराच्या दरम्यान असल्यामुळे एखाद्या गावात गुन्हा घडल्यास तेथे पोचणे पोलिसांना व पोलिस ठाण्यास जाण्यास फिर्यादीला अनंत अडचणी उद्भवत होत्या.त्यामुळे नूतन पोलिस ठाण्याची मागणी होत होती. 
  मात्र नव्याने होऊ घातलेल्या तालुका पोलिस ठाण्याच्या निर्मितीमुळे फिर्यादी,जनता यांची सोय होण्यापेक्षा गैरसोयच जास्त होण्याची शक्यता असल्याचे लोकामधून उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.पांगरी पोलिस ठाण्याच्या जवळ असलेली व लोकांच्या सोयीने पांगरीच हितकारक असलेली अनेक गांवे नूतन तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्यामुळे पुन्हा येथील लोकांना गैरसोयीचे होण्याची शक्यता आहे.नवीन पोलिस ठाण्यासाठी गावांची निवड करताना कोणत्या गावाला कोणते पोलिस ठाणे सोयीचे ठरू शकते याचा विचार केला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.पांगरी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या धानोरे,कुसळंब,पाथरी आदी अनेक गावांचा नवीन पोलिस ठाण्यात समावेश करून प्रशासनाणे काय साधी केले आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
 पांगरी पोलिस ठाण्यातील धोत्रे,शेलगांव (मा),कुसळंब,बावी (आ.) आदी गावातील नागरिकांनी आपला नूतन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाण्यास विरोध असल्याचे संकेत दिले आहेत.आम्हाला पांगरी पोलिस ठाणेच सोयीचे असल्याबात बर्‍याच ग्रामपंचायतिणी ग्रामसभेत लेखी ठराव घेतले असल्याचे समजते.
  पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेलगांव(मा), जामगांव, भोयरे, ताडसौंदणे, वाणेवाडी, शेलगांव(व्हळे), गाडेगांव, कांदलगांव, खडकलगाव, मांडेगांव, बेलगाव, उंबर्गे, बावी(आ), तावडी, आरणगांव, आगळगांव, बाभुळगांव, कुसळंब, धोत्रे, बोरगांव, चारे, चुंब, धामनगांव, धानोरे, कोरेगांव, पाथरी, खडकोणी, धनगरवाडी, भानसाळे, देवगांव, धसपिंपळगांव, काटेगांव ही गावे तर खांडवी, उपळाई (ठोंगे)वांगरवाडी, शेंद्री, बळेवाडी, कव्हे, दडशिंगे, सौंदरे, तावरवाडी, श्रीपत पिंपरी, गोडसेवाडी, कोरफळे, मालवंडी, गूळपोळी, तुर्कपिंपरी, सुरडी, उंडेगांव, रस्तापुर, पानगांव, कळंबवाडी ही वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावे नवीन तालुका पोलिस ठाण्याच्या कक्षेत जाणार आहेत.

 
Top