पांगरी (गणेश गोडसे) :- खडकोणी ता.बार्शी येथे खंडोबा यात्रेनिमित्त सलग तिन दिवस विविध धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खडकोणीचे सरपंच सचिन नलावडे यांनी प्रशिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
16 डिसेंबर रोजी सायंकाळी सरपंच सचिन नलावडे यांच्या वतीने गावजेवणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे॰17 डिसेंबर या यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे चंपाष्टमी दिनी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यन्त लंगर व त्यासंदर्भातील इतर धार्मिक विधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.त्याच दिवशी दुपारी तिन ते सहा वाजेपर्यंत राज्यातील विविध नामांकित मल्लाच्या कुस्त्यांचा भव्य फड भरवण्यात येणार आहे.सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान शोभेच्या दारूची आतषबाजी होणार आहे.त्यानंतर संध्याकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान राज्यभरात विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करत असलेल्या गावातील गुणीजनाचा ‘खडकोणी भूषण’ पुरस्काराने सन्मान करण्याचा कार्यक्रम मान्यवराच्या शुभ हस्ते पार पडेल.त्यानंतर रात्री एके 47 हा विनोदी एकपात्री प्रयोगाचा कार्यक्रम होणार आहे.18 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी तिन वाजेपर्यंत रक्तदान शिबीर होणार आहे.सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत महिलांसाठी सर्व रोग निदान शिबीर तसेच दंत तपासणी,मोतीबिंदु शिबिराचे आयोजान करण्यात आलेले आहे.त्याच रात्री आठ नंतर ‘हि दौलत महाराष्ट्रची’ हा लोकनृत्य,लोकसंगीत,पोवाडा,लावणी,व चित्रपट गितांचा सदाबहार कार्यक्रम पार पडणार आहे. मान्यवर वक्त्याचे व्याख्यानाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी,विविध गावाचे सरपंच,पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत॰तरी यात्रेस उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सचिन नलावडे व यात्रा आयोजन समितीने केले आहे.