उस्मानाबाद :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उस्मानाबाद आयोजित सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतीसाठी परंडा येथे दुग्धव्यवसाय,शेळीपालन व कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रम दि.22 डिसेंबर ते 2 जानेवारी,2016 या 10 दिवसीय कालावधीत आयोजित केला आहे.
      या प्रशिक्षण कार्यक्रमाध्ये संपुर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व,गायीच्या जाती,चाऱ्याचे नियोजन,लसीकरण,दुधाचे पॅकींग,दुध विक्री तसेच शेळी पालन,उस्मानाबाद शेळीचे महत्व,करडयाची निगा, शेळीचे लसीकरण,शेळीचे आहार व आजाराविषी माहिती,अर्ध बंदिस्त व बंदिस्त शेडची माहिती,शेळीच्या वेगवेळया जातीची माहिती व कुक्कुट पालनमध्ये गावराण व बॉयलर या विषयी स‍विस्तर माहिती तसेच खाद्यांची व शेडची माहिती,विमा,आजारविषयी माहिती इत्यादी व उद्योजकांचे मार्गदर्शन करण्यात येणारआहे.
               तसेच उद्योजकीय माहिती यामध्ये संभाषण कौशल्य,उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास,प्रकल्प अहवाल,बॅक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन,शासकीय कर्ज प्रस्तावाची सविस्तर माहिती,अहिल्याबाई होळकर महामंडळाची सविस्तर माहिती तसेच नाबार्ड इत्यादी विषयी माहिती दिली जाणार आहे.तरी इच्छुक युवक-युवतींनी अधिक माहितीसाठी व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक,किशोर कांबळे मो.नं.9881558846 यांच्याशी पंचायत समिती परंडा येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी,जिल्हा उद्योग केंद्र,उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top