उस्मानाबाद :- राष्ट्रीय कृषी व विकास योजने अंतर्गत भूम उपविभागात आंबा फळपिकावरील किडरोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापण प्रकल्प सन 2015-16 राबविण्यात येत असून या अंतर्गत वाशी,कळंब,व परंडा तालुक्यात प्रत्येकी एक किड सर्वेक्षणमार्फत तसेच उपविभागातील चारही तालुक्यात किड नियंत्रणामार्फत आंबा पिकावरील प्रमख किडी,तुडतुडे,फुलकिडे तसेच भुरी व बुरशीजन्य करपा या रोगासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.या माहितीच्या आधारे विश्लेषण करून दर सोमवारी व गुरूवारी या दिवसी किड व रोगाचे नियंत्रणाबाबत उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत,तसेच तालुकानिहाय सल्ला www.ncipm.org.in या वेबसाईटवर पहावयास मिळेल.
आंबा पिकावरील तुडतुडे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड-17.8 टक्के एस.एल 3 मीली किंवा थायोमीथोक्झाम -25 टक्के डब्लु.जी. 1 गॅम गॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.मोहरावरील फुलकिडे नियंत्रणसाठी डायमिथेएट-30इ.सी. 10 मिली तसेच बुरशीजन्य करपा रोगासाठी कार्बेडेझिम-50 डब्लु.पी.10 गॅम किंवा थायोनिफेट मिथील -70डब्लु.पी.10 गॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी,आवाहन उपविभागिय कृषी अधिकारी,भूम यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.