उस्मानाबाद :- राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी 6 किंवा 4 किंवा 2 संकरीत दुधाळ गायी/म्हैशीचे गट वाटप करणे ही नाविन्यपुर्ण योजना जिल्हृयात सन 2015-16 मध्ये राबविण्यात येणार आहे.
          या योजनेमध्ये 6 दुधाळ जनावरे गटासाठी जनावराचा विमा, जनावरांचा गोठा, कडबा कुट्टी यंत्र खाद्यासाठवणुकीचे शेड व जनावर खरेदी इत्यादी बाबीसाठी खर्च करण्यात येणार आहे. चार किंवा दोन या गटामध्ये जनावर खरेदी व जनावरांचा विमा या बाबीवर खर्च कारण्यात येणार आहे. एका गटाची किंमत अनुक्रमे रु. 3 लाख 35 हजार 184, रू -1 लाख 70 हजार 125  व रू 8 लाख 50 हजार 161 इतकी आहे. या मध्ये सर्वसाधारण लाभार्थीसाठी 50 टक्के अनुदान व अनु.जातीच्या लाभार्थीसाठी 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.सहा संकरीत दुधाळ गाई/म्हशीचे गट वाटप या योजनेमध्ये चालू वर्षासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येत असून.ज्या लाभार्थीने यापुर्वी अर्ज केले होते,अशा लाभार्थीने नमुद केलेले निकष पुर्ण करीत असतील तर त्यांनी पुन्हा सदर योजनेमध्ये पशुधन विकास अधिकारी विस्तार यांच्याकडे अर्ज सादर करावेत. महिला बचत गटातील लाभार्थी, अल्प भुधारक शेतकरी,सुशिक्षीत बेरोजगारअसावा. तसेच लाभार्थीनी अर्जामध्ये स्पष्टपणे गटाचा उल्लेख करावा.पात्र लाभार्थीची निवड ड्रॉ पध्दतीने केली जाणार आहे.या योजनेचे अर्ज दि. 12 डिसेंबर 2015 ते 9 जानेवारी 2016 पर्यंत पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येतील.अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी ( वि ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,उस्मानाबाद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.          
 
Top