उस्मानाबाद :- जिल्हृयातील माजी सैनिक/ विधवांच्या पाल्यांनी सरळसेवा भरती सन 2025 आरोग्य सेवका (महिला) संवर्गामधील पदे माजी सैनिकांच्या महिला उमेदवारासाठी भरण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत आरोग्य सेविका महिला या संवर्गाची सन 2015 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता माध्यमिक शांलात परिक्षा उत्तीर्ण आणि सहायक परिचारिका प्रसविका परिक्षा उत्तीर्ण (ए.एन.एम. 18 महीन्याचे प्रशिक्षण उत्तीर्ण) आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा महिला उमेदवार पात्र असतील. या करीता वरील शैक्षणिक अर्हता धारक पात्र माजी सैनिकांच्या पत्नी व पाल्य (महिला) उमेदवाराची नावे या कार्यालयामध्ये (जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद) दि. 20 डिसेंबर 2015 पर्यंत पाठवावे. तरी या संधीचा माजी सैनिकांनी जास्ती जास्त लाभ घ्यावा,असे जिल्हा सेनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी एका पत्रकाद्वारे  कळविले आहे
 
Top