उस्मानाबाद :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध राजकीय पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसिलदार सुभाष काकडे, नायब तहसिलदार राजेश जाधव तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. मिलींद पाटील, फुलचंद गायकवाड, मोहन कुलकर्णी, राहुल सोनवणे आदीजण उपस्थित होते.
उस्मानाबाद शहरातील प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 59 जणांनी रक्तदान केले. शिबीराच्या उदघाटनप्रसंगी नगरसेवक माणिक बनसोडे, डी.के. कांबळे, नागराज साबळे, मोहिनी बनसोडे, लक्ष्मी ढाले आदीजण उपस्थित होते.