उस्मानाबाद :- केंद्र शासनाच्या युवा नेता प्रशिक्षण अंतर्गत नेहरू युवा केंद्रच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा चार तालुक्यत संपन्न झाल्या देशभक्त एंव राष्ट्रप्रेम या विषयावर तालुका पातळीपासून ते देशपातळीपर्यत हिंदी अथवा इग्रंजी भाषेतून ही स्पर्धा वयोगट 18 ते 29 खुली ठेवण्यात आली होती.उस्मानाबाद येथे रामकृष्ण परंमहंस महाविद्यालयामध्ये 9 स्पर्धकांनी आपला सहभाग नेांदविला. तुळजापूर येथील अध्यापक विद्यालयातील 7 स्पर्धकांनी आपला सहभाग नेांदवला.कळंब येथे पार पडलेल्या छत्रपती महाविद्यालयात 6 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
उसमानाबाद तालुक्याच्या स्पर्धा यशस्वी होण्यासठी प्रा.केशव क्षीरसागर, एन.वाय.सी. श्याम नरवडे, वैभव लांडगे यांनी, तुळजापूर येथील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महेंद्र कावरे, एन.वाय.सी,गणेश नावाडे, युवा कार्यक्रर्ते प्रशांत गावडे, कळंब येथील स्पर्धेसाठी प्रविण बागरेचा,एन.वाय.सी,महेंद्र सरवदे, राहुल जगताप यांनी तर भूम येथील स्पर्धेसाठी युवा कार्यकर्ते रामेश्वर चोबे,प्रियंका चैारे यांनी परिश्रम घेतले