नळदुर्ग :- कायदयाच्या चौकटी राहून अखेरच्या श्वासापर्यंत पुनर्वसनाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची सर्वांनी तयारी ठेवली पाहिजे, या मानवी हक्काच्या लढयात सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनतेनी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले पाहिजे. बेघरांना त्यांच्या हक्काचे घर मिळेपर्यंत हा कायदेशीर लढा चालूच राहील, असे आव्हान जेष्ठ समाजावादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांनी नळदुर्ग येथे आयोजित पुनर्वसन परिषदेत बोलताना केले.
निवारा पुनर्वसन कृती समिती नळदुर्गच्यावतीने मंगळवारी पुनर्वसन परिषद संपन्न झाली. यावेळी सुराणा हे बोलत होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ॲड. विष्णू ढोबळे म्हणाले की, एखादया जागेवर अनेक वर्षापासून वास्तव्य करुन राहणारी वस्तीची जागा शहर विकास आराखडयाच्या आरक्षणाच्या व्याख्येत बसत नसून गोरगरीब बंजारा (लमाण), दलित व मुस्लिम कुटूंबियांचा निवारा उध्दवस्त करुन त्यांना बेघर करणे हा एक प्रकारचा अन्याय असून संबंधित अधिका-यावर फौजदार गुन्हा दाखल झाला पाहिजे.
तर स्वराज्य अभियानाचे सुभाष लोमटे म्हणाले की, प्रशासनाने नागरिकांची घरे उध्दवस्त केलेली घटना कायदयाच्या व माणुसकीच्या विरोधात आहे. हे बेकादेशीरकृत्य करणा-यावर कारवाई झाली पाहिजे. शासनाने केलेली चूक दुरुस्त करुन बेघरांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. तसेच बेघरांच्या पाठीशी मराठी पत्रकार परिषद ही पूर्ण ताकदीनिशी असल्याचे पत्रकार सुनील ढेपे यांनी यावेळी सांगितले. तर मनसेने या परिषदेला जाहीर पाठींब्याचे पत्र देवून मनसे स्टाईलने नळदुर्गमधील सर्व शासकीय इमारतीचा ताबा घेणार, बेघरांना निवारा उपलब्ध करुन देणार, जोपर्यंत बेघरांना न्याय मिळत तोपर्यंत मनसे स्वस्थ बसणार नाही. याप्रकरणी पाठपुरावा करणार, प्रसंगी रस्त्यावर उतरुन प्रशासनाशी दोन हात करण्याचा इशारा यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी दिला.
यावेळी बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब राठोड, वाशिम जिल्हाध्यक्ष रमेश पवार, गोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पवार, मन्सूर शेख, शाहेदाबी सय्यद, निर्मला गायकवाड, विनायक अहंकारी, मारुती खारवे, सचिन डुकरे, जोतीबा येडगे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुनर्वसन परिषदेचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दयानंद काळुंके, बळीराम जेठे, संतोष बुरंगे, शाहेदाबी सय्यद यांनी चळवळीचे गीत गायन केले.
परिषदेचे निमंत्रक एस.के. गायकवाड यांनी नळदुर्ग नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली चुकीच्या पध्दतीने नागरिकांची राहती घरे उध्दवस्त करुन बेघर केलेल्या कुटूंबियांचे पूर्वी राहत असलेल्या जागेवरच शासनाने त्वरित पुनर्वसन करावे, विस्थापित झालेल्या बेघर कुटूंबियांना रोजगाराची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दयावी, दि. 31 मार्च पर्यंत वरील संदर्भात दि. 31 मार्च 2016 पर्यंत वरील संदर्भात पक्का आदेश न निघाल्यास आंदोलन उभे करण्यात येईल आदी ठराव मांडले. टाळयांच्या गजरात सदर ठराव मंजूर करण्यात आले.
या कार्यक्रमास अरुण लोखंडे, दयानंद काळुंके, शिवाजी पोतदार, संतोष बुरंगे, बळीराम जेठे, सुनील बनसोडे, मनसेचे बशीर शेख, गौस कुरेशी, प्रमोद कुलकर्णी, शिरीष डुकरे, सादीक बागवान, लक्ष्मण राठोड, बळीराम पाटील, यशवंत बेले, गणी बागवान, महादेव पिस्के, सामाजिक कार्यकर्त्या संगिता गायकवाड, फातिमा कुरेशी, सतीश राठोड, दादासाहेब बनसोडे, खय्युम कुरेशी आदीजण उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोतीराम चव्हाण, बालेश्वर नाईक, राम नाईक, अशोक बंजारे, राजाराम नाईक, विकास जाधव, दत्तात्रय राठोड, बाशीद कुरेशी, निजाम बागवान, बंडू जाधव, सुनिल पवार, अरुण नाईक, विकास नाईक, रवी राठोड, अविनाश बंजारे, विकास बनसोडे, नितीन कांबळे आदीनी परिश्रम घेतले.
परिषदेचे प्रास्ताविक शिवाजी नाईक यांनी तर सुत्रसंचालन हरिष जाधव यांनी केले. भैरवनाथ कानडे यांनी आभार मानले. यावेळी अन्यायग्रस्त नागरीक, कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.



 
Top