उस्मानाबाद - उस्मानाबाद बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या एस.टी.डेपोमध्ये एस.टी.कर्मचारी संघटनेचे नेते दिलीप सोनटक्के यांनी ड्युटीवर असताना बसमध्येच गळफास घेवून आत्महत्त्या केली.जेव्हा बस बुधवारी सकाळी आठच्या सुमारास लातूरला जाण्यासाठी बस स्थानकात आली,तेव्हा महिला प्रवाश्यांनी आत प्रवेश करताच लटकताना प्रेत दिसले आणि आत्महत्त्यचा हा प्रकार उघडकीस आला.
दिलीप सोनटक्के (वय ४५)हे एस.टी.डेपोमध्ये मेकॅनिक असून,ते बस स्थानक,एस.डेपो शेजारी असलेल्या एस.टी.क्वॉर्टरमध्ये राहत होते.घर ते एस.टी.डेपो केवळ हाकेच्या अंतरावर आहे.बुधवारी रात्री ते ड्युटीवर असताना एम.एच.२०, बी.एल.१०५३ या बसमध्ये त्यांनी गळफास घेतला.बुधवारी सकाळी चालक एस.आर.माळी यांनी लातूरला बस नेण्यासाठी स्थानकात बस आणल्यानंतर काही महिला प्रवाशी बसमध्ये चढल्या असता,प्रेत लटकताना दिसले आणि एकच खळबळ उडाली.
दिलीप सोनटक्के हे एस.टी.कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस होते.ते आत्महत्त्या करणारे नेते नव्हते,मग त्यांनी आत्महत्त्या का केली असावी,याचे सर्वांनाच कोडे पडले असून,ही आत्महत्त्या आहे की हत्त्या याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
त्यांच्या आत्महत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्या नातेवायकांकडून होत आहे.अधिक तपास शहर उत्तर पोलीस करत आहेत.