नळदुर्ग
:- निवारा पुनर्वसन परिषदेच्या लढयास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असल्याचे
पुनर्वसन परिषदेवेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्यासह उपस्थित
मान्यवरांना मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, नळदुर्ग शहराध्यक्ष ज्योतीबा येडगे
यांनी यांना दिले.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली गोर-गरीब
लोकांची घरे उध्दवस्त करुन त्या कुटूंबांना बेघर केले. हे अमानवी कृत्य आहे. याचा जाहीर
निषेध करुन बेघर झालेल्या कुटूंबियांना घरे मिळवून देण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे स्वस्त लक्ष घालणार आहेत. बेघर
कुटूंबियांची पक्षाचे राज्य सचिव प्रमोदजी पाटील यांनी भेट घेवून घरे मिळवून देण्यासाठी
व पुनर्वसनासाठी मनसे वचनबध्द असल्याचे सांगितले. हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मनसे
वचनबध्द असल्याचे पत्रात म्हटले आहे. पत्रावर जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, परिवहनचे
जिल्हा उपाध्यक्ष बशीर शेख, नळदुर्ग शहराध्यक्ष ज्योतिबा येडगे, सचिव प्रमोद कुलकर्णी,
उपाध्यक्ष गौस कुरेशी, रमेश घोडके, अरुण जाधव, शिवाजी चव्हाण, विदयार्थी सेनेचे शहराध्यक्ष
शिरीष डुकरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.