शिरीष डुकरे
नळदुर्ग :- शिव-बसव-राणा सार्वजनिक जयंती महोत्सवाचे औचित्य साधून दि. 26 मार्च रोजी भव्य मोटारसायकल रॅलीने थोर महापुरुषांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना, दि. 27 रोजी व्याख्यान व दि. 29 मार्चला सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूकीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर महाराज, वीर महाराणा प्रताप या थोर महापुरुषांची सार्वजनिक जयंती नळदुर्ग येथे साजरी होत आहे. यानिमित्त नळदुर्ग येथील मल्लिकाजून सांस्कृतिक सभागृह येथे शिव-बसव-राणाचे मावळते अध्यक्ष तथा शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक जयंती महोत्सवाची नूतन कार्यकारणाची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली. अध्यक्षपदी शिरीष डुकरे यांची तर उपाध्यक्षपदी नेताजी महाबोले, अतुल डोंगरे, कोषाध्यक्ष म्हणून संतोष पुदाले, कार्याध्यक्ष विनायक अहंकारी, सचिव ओंकार कलशेटटी, सागर हजारे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीस शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी, नगरसेवक संजय बताले, नितीन कासार, माजी नगरसेवक शरद बागल, अमृत पुदाले, सुधीर हजारे, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके आदीजण उपस्थित होते.

 
Top