नळदुर्ग –: सोमवार दि. 21 मार्च रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूर शाखेच्यावतीने शासकीय पडगायराण जमिनीवरील दलित भुमिहीनानी केलेले अतिक्रमण कायम करून जमिनीचे पट्टे त्यांच्या नावे करावीत या प्रमुख मागणीसह अन्न महत्वाच्या मागणीसाठी तुळजापूर तहसिल कार्यालयावर मोर्चा निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
       या आंदोलनात तालुक्यातील पडगायराण जमिनीवरील अतिक्रमण कायम करावे, नळदुर्ग ता. तुळजापूर येथील विस्थापित बंजारा (लमाण), दलित, मुस्लिम बेघर कुटूंबाचे व धंदेवाल्यांचे त्वरीत पुनर्वसन करा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृती त्वरीत वाटप करा, तुळजापूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसावा आदीसह अन्य मागण्या करण्यात येणार असून या आंदोलनास रिपाइंचे जिल्हाध्यख राजाभाऊ ओव्हाळ, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

   तरी तालुक्यातील तमाम भूमिहीन अतिक्रमण धारकांनी रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, विधान सभा अध्यक्ष प्रकाश कदम, अरूण लोखंडे, बाबासाहेब बनसोडे, अरूण कदम, शिवाजी कदम, विठ्ठल जेटीथोर, धम्मशिल कदम, ज्ञानदेव बनसोडे, वसंत रोकडे, दत्ता बनसोडे, संजय नाना शितोळे, विशाल मस्के, मारूती जेटीथोर आदींनी केले आहे.  
 
Top