नळदुर्ग :- पावसाळयापुर्वीच तातडीने नळदुर्ग ता.तुळजापूर
येथिल बेघरांचे पुनर्वसन करणार असल्याचे सांगून प्रथम जागेच्या कबाल्याची कारवाई करुन, त्यानंतर घरे बांधून देण्याची प्रक्रिया शक्यतो लवकरात लवकर करणार असल्याचे उस्मानाबाद
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नळदुर्ग येथे बेघर कुटुंबियांची भेट घेवुन अश्वासन दिले. याप्रकरणी
तहसिलदार व मुख्याधिकारी याना याची अमलबजावणी
करण्याचे आदेश नागरिकाशी संवाद साधताना दिले.
रविवार
रोजी सायंकाळी 5 वाजता नळदुर्ग येथील बंजारा (लमाण) सामाजाच्या बेघर कुटुंबियांना जिल्हाधिकारी
डॉ.प्रशांत नारनवरे यांनी भेट देवुन त्याची व्यथा समजुन घेतली यावेळी ते बोलत होते.
डिसेंबरमध्ये नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली सर्व्हे
नं. 29 मध्ये पन्नास वर्षापूर्वीपासून वडिलोपर्जित कब्जे वहिवटी नूसार राहणा-या लमाण,
दलित, मुस्लिम समाजाची राहती घरे एकाच वेळी तीन ते चार जेसीबीने आघोरी पध्दतीने उध्वस्त
करून अनेक कुटुंबांना हुस्कावून लावुन त्याना बेघर केले . त्यामुळे या कुटुंबांचे संसार
उघडयावर पडले. अनेक बेघर कुटुंबांना शहरात घर जागा नसल्याने ते शहराबाहेर डोंगर माळरानावर
आसरा घेतले आहे. ही अन्यग्रस्त घटना घडून पावणे तीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दि.20 मार्च रोजी अचानक नळदुर्गला भेट देवुन सर्व्हे नं. 29 मधील लमाण व दलित समाजाची घरे न.प.ने
उध्वस्त केलेल्या जागेची पाहणी केली.
भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकाच्या
मदतीला अनेकजण धावून आल्याचे आल्याचे सर्वश्रुत
आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली संपूर्ण वस्तीवर बुलडोजर फिरवून
अनेक कुटूंबांना हुसकावून लावून बेघर केले. या अन्यायग्रस्त कुटूंबियांच्या मदतीला
कुणीही पुढे आले नाही, बेघर झालेले जवळपास पन्नास कुटूंबियांनी नळदुर्ग
शहराबाहेर अक्कलकोट रोडलगत डोंगर माळरानावर कडाक्याच्या थंडीमध्ये उघडयावर पडल्याचे
विदारक चित्र शहरवासियांनी पाहिले.
जिल्हाधिकारी नारनवरे यानी अक्कलकोट रोडलगत पाडण्यात
आलेल्या घराची पाहणी करुन न.प.ने केलेल्या कारवाईची माहिती नगराध्यक्ष मुनवर सुलताना
कुरेशी , न.प. सदस्य कमलाकर चव्हाण ,पत्रकार शिवाजी नाईक यांच्यकडुन जाणुन घेतली.
जिल्हाधिकारी
नारनवरे यावेळी बोलताना सांगितले की, बेघर
झालेल्या कुटूंबांना घरे कशी बांधून देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल.
घरे बांधून देण्यापूर्वी जागेचे कबाले लाभधारकाच्या
नावे करुन देण्याचे सांगुन बेघर झालेल्या कुटूंबाचे
पुनर्वसनासाठी लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे नगरपालिकेस जिल्हाधिका-यांनी आदेश
देवून लाभार्थ्यांनी राहत असलेल्या जागेवर पूर्वी घरपट्टी, नळपट्टी, लाईट बील आदी भरले
असल्याचे पावत्या, त्याचबरोबर रेशनकार्ड यासह इतर जुने कागदपत्रे पुरावे ग्राह्य धरण्यासाठी
संकलित करण्याचेही आदेश त्यांनी दिले यावेळी तहसिलदार के.एच. पाटील, नगराध्यक्षा मुनवर
सुलताना कुरेशी, प्रभारी मुख्याधिकारी नायब तहसिलदार एन.बी. जाधव, तलाठी तुकाराम कदम, मंडळ निरीक्षक
अमर गांधले, नगरसेवक कमलाकर चव्हाण, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका निर्मला गायकवाड, पत्रकार शिवाजी नाईक , राम नाईक , अशोक बंजारे,
रहीम सय्यद, फुलचंद जाधव , संजीवनी पवार, श्रीमती
सुनिता बनसोडे, सादिक जहागीरदार आदीजण उपस्थित होते.