पुणे :- सोशालिस्ट पार्टी
(इंडिया) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना यंदाचा
“पुण्यभूषण” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबदृल जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल
भाऊ सुराणा यांनी त्रिदल-पुणे आणि पुण्यभूषण फाऊंडेशन संस्थेने भाई वैदय यांच्या कार्याची
योग्य मूल्यमापन करुन पुरस्कारासाठी निवड केल्याबददल अभिनंदन केले आहे.
कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या
फाळाने पुण्यभूमी नांगरणारे बालशिवाजी अशी प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह, एक लाख रूपये,
शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच होणा-या एका कार्यक्रमात वैद्य यांना
हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन 1993 च्या भूकंपानंतर नळदुर्ग येथे भूकंपातील
अनाथ मुलां-मुलींसाठी “आपलं घर” प्रकल्प स्थापनेत भाई वैदय यांचा मोलाचा वाटा असल्याचे
सांगून पन्नालाल सुराणा यांनी भाई वैदय यांच्या गत जीवनातील आठवणीना उजाळा दिला.
भाई वैद्य हे गेली साठ वर्षे सतत सार्वजनिक जीवनात असून शेतक-यांच्या आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर लढत आलेले आहेत. तेंव्हा
हा पूरस्कार त्यांना मिळून त्यांच्या कार्याचे योग्य मुल्यमापन या संस्थेने केले. त्याबद्दल
पन्नालाल भाऊ सुराणा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी गोव्याच्या सत्यागृहात
भाग घेतला होता तर त्यांना खूप पोलिसांचा लाठीहल्ला सहन करून करावा लागला. त्यामध्ये
त्यांच्या डाव्या हाताला कायमचे अपंगत्व आले आहे.
शालेय जीवनात 1942 च्या चलेजाव चळवळीमध्ये सहभाग घेत भाई वैद्य यांच्या कारकीर्दीला
सुरूवात झाली. 1955 मध्ये गोवा स्वातंत्र्य चळवळीत त्यांना जबर मारहाण झाली होती.
1961 मध्ये झालेल्या कच्छ सत्यागृहातील सहभागानंतर आणीबाणीमध्ये मिसाबंदी म्हणून त्यांना
19 महिने करावास भोगावा लागला होता. सत्याग्रहामध्ये सहभाग घेतल्याबद्दल आतापर्यंत
त्यांना 25 वेळा तुरूंगवास झाला असून वयाच्या 88 व्या वर्षी शिक्षण हक्कासाठी त्यांनी
शेवटचा सत्याग्रह केला होता. जयप्रकाश नारायण डॉ. राम मनोहर लोहिया, एस.एम जोशी यांच्या
नेतृत्वाखालील काँग्रेस सोशालिस्ट पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करून 1946 मध्ये वैद्य
यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. समाजवादी पक्षाची जी रूपांतरे झाली त्यामध्ये सक्रीय
सहभाग घेतलेले वैद्य सध्या सोशालिस्ट पार्टी (इंडिया) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून
कार्यरत आहेत.
1974 मध्ये पुण्याचे महापौर असताना ते ऑल इंडिया मेयर्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष
होते. 1978 ते 1980 या कालखंडात भाई वैद्य
गृहराज्यमंत्री होते. या काळातच मराठवाडा विद्यापिठ नामांतर विधेयक मांडले गेले. स्मगलरचे
सात साथीदार तीन लाख रूपयांची लाच घेवून आले असता त्यांना पोलिसांच्या हवाले करून तुरूंगात
धाडले होते. गृहराज्यमंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार निर्मुलनाची फार मोठे काम करून
दाखविले. 1983 साली जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी
ते (राजघाट) दिल्ली या चार हजार किलोमिटरच्या भारत यात्रेमध्ये त्यांचा सहभाग होता.
अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, खडकी ॲम्यूनिशन फॅक्टरी वर्क्स युनियन, दिल्ली येथील
भारत यात्रा ट्रस्ट, आणि पुणे मानपा सेवानिवृत्त संघ या संस्थेचे अध्यक्ष आहेत.