नळदुर्ग :- येथील
नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाचे विदयमान उपनगराध्यक्षा सौ. लक्ष्मीताई खारवे यांचे
पती सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे यांना न.प. चे कार्यालयीन अधिक्षकानी अश्लिल भाषेत
शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात अदखलपात्र गुन्हा
नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोशल मिडियावर
मोबाईल झालेले संभाषणाची ऑडिओ क्लिपने धुमाकूळ घातल्याने सर्वत्र जोरदार चर्चा होत
आहे.
दिपक कांबळे (रा. नळदुर्ग) असे गुन्हा दाखल झालेल्या
कार्यालयीन अधिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी मारुती सुदाम खारवे (रा. नळदुर्ग) यांनी
दिलेल्या तक्रारी अर्जानुसार बुधवार दि. 23 मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास
दिपक कांबळे यांनी मारुती खारवे यांना मोबाईलवरुन फोन करून अर्वाच्या भाषेत शिवीगाळ
करून जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणात कांबळे यांना कोणी कान भरले व कोणी माझ्या
विरूध्द भडकाविले याची मला माहिती नाही. ज्या नगरसेवकांनी सांगितले त्यांची चौकशी करून
त्या नगरसेवकांकडून व दिपक कांबळे कडून माझ्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी
चौकशी करून गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करावी. असे नमूद करून भविष्यत मला व माझ्या
कुटुंबाला काही अनर्थ घडल्यास याची सर्वस्वी जबाबदार मोबाईल फोन वरून धमकी देणारे दिपक
कांबळे व त्याच्या सोबतचे इतर नगरसेवक राहील, असेही अर्जात मारूती खारवे यांनी म्हटले
आहे.
9765106448 या नंबरवरुन नळदूर्ग नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक
दिपक कांबळे य़ानी
मारुती खारवे यांना दि. 23 मार्च
रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फोन करुन "तु नेहमी
नेहमी माझ्या सोबत सारखे तक्रारी
का करतोस" असे
म्हणून गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून जीवे
मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी
न.प.चे कार्यालयीन अधिक्षक
दिपक कांबळे याच्याविरुध्द
नळदूर्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र
गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार एस.यु. तांबोळी
हे करत आहेत.