नंळदुर्ग :- सर्वत्र पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने शहरापासून
ते ग्रामीण भागापर्यंत पाण्याचा धंदा तेजित आहे. मात्र भाजपाच्यावतीने नळदुर्ग येथे
पाणपोईचे शुभारंभ करण्यात आले आहे. त्यामुळे नळदुर्ग परिसरातील अनेक बाहेरगावाहून दैनंदिन
कामकाजाकरिता शहरात येणा-या ग्रामस्थांची ऐन कडाक्याच्या उन्हात तृष्णा भागवली जाणार
आहे.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने नळदुर्ग शहरातील शास्त्री चौकात नुकतेच पाणपोईचे
शुभारंभ करण्यात आले. यावेळी, शहराध्यक्ष पदमाकर
घोडके, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, उपाध्यक्ष बापू दुरुगकर, भाजपाचे सुशांत
भूमकर सरचिटणीस सागर हजारे, शंकर वाघमारे, भिमाशंकर बताले, अजय ठाकूर, आकाश घोडके,
महादेव फरताळे, प्रविण कोकणे, महादेव वाघमारे, गजानन हळदे, विजय ठाकूर आदीजण उपस्थित
होते.