![]() |
पद्माकर घोडके |
नळदुर्ग :- भारतीय जनता
पार्टीच्या नळदुर्ग शहराध्यक्षपदी पद्माकर घोडके यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर
उपाध्यक्षपदी बापू दुरूगकर, युवामोर्चाच्या अध्यक्षपदी श्रमीक पोतदार, सरचिटणीस पदी
सागर हजारे, भिमाशंकर बताले, विशाल डुकरे, शंकर वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
शहरात अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात रविवार दि.
13 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह नळदुर्ग येथे जिल्हा मिडीया प्रमुख सुशांत भुमकर तालुकाध्यक्ष
सत्यावन सुरवसे, दत्ता राजमाने, दिलीप कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली.
यामध्ये सर्वानुमते पुनश्चय एकदा पद्माकर (पिंटू भाऊ) घोडके यांची फेरनिवड करण्यात
आली. उर्वरीत कार्यकारणी लवकरच निवडण्यात येणार आहे. यावेळी गोपाळ देशपांडे, धिमाजी
घुगे, संतोष सांगवे, अमर शेंडगे, मारूती घोडके, अजय ठाकूर, उमेश नाईक, बालाजी दस, गिरजप्पा
जाधव, विजय चव्हाण, अबेद्दीन कुरेशी, अजय गायकवाड, बबन काळे, जमनसिंग ठाकूर, महादेव
वाघमारे, आकाश कुलकर्णी, सारंग जोशी, स्वप्नील गुरव, संभाजी चव्हाण आदीजण उपस्थित होते.