तुळजापूर :- समाजात पिढयांनपिढया अनेक कुप्रथा चालत आले असुन यांचा विरोध करून सामजिक भान जपणा-याची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. हुंडा नावाच्या कुप्रथेस दुर सारून अत्यंत साधे पणाने  विवाहाच्या रेशिम बंधनात अडकण्याचे ठरवल्याची सुखद धक्का देणारी घटना फुलवाडी ता. तुळजापूर येथे घडली.
हुंडा देणे घेणे या चालीरितीमुळे समाजात अनेक दु:खदायक घटना, सुनेस जाचहाट मारहाण प्रसंगी जीवे मारणे, स्त्री भ्रणहत्या अशा घटना वर्षानुवर्ष घडत आहे. त्यामुळेच मुलींचा जन्मदर घटला आहे. मुलींचा जन्म दर वाढण्यासाठी शासन स्तरावर पावले उचलली जात आहेत. मात्र याही पेक्षा प्रभावी मार्ग हुंड्या विना लग्न. याचे ज्वलंत उदाहरण   फुलवाडी ता.तुळजापूर येथे  हुंडा या चुकीच्या परंपरेला झुगारून खुदावाडीचे   सौ. राजश्री व  रेवणसिद्ध बोंगरंगे  यां उभयंताचे सुपूञ शांतेश्वर यांनी हुंडा न घेता  लग्न करण्याचा निश्चय केला.त्यानुसार मुलगी पाहण्याचा कार्यक्रम फुलवाडी येथे संपन्न झाला.  कामधेनु संस्थेचे सचिव बळीराम जेठे यांची भाच्ची माधूरी परमेश्वर आंबरे (रा.येणेगुर ता. उमरगा ) यांच्याशी मुलगी पाहण्याच्‍या कार्यक्रमात विवाह प्रसंगी वधु बरोबर केवळ नारळ व्यतीरिक्त इतर कसलीही अपेक्षा न बाळगता  विवाह बंधनात अडकण्याचे संमती दर्शविली आहे.असे बळीराम जेठे यानी बोलताना सांगितले .
याप्रसंगी फुलावाडीचे प्रतिष्ठित राजेंद्र धबाले , खुदावाडीचे ग्रा.प.सदस्य पांडूरंग बोगरंगे , राजेंद्र बोंगरगे , खंडाप्पा बोंगरगे  , सौ.शालिनी जेठे ,बळीराम जेठे याच्य अन्य मान्यवरानी पुढाकार घेतला.
 
Top