नळदुर्ग :- मराठी भाषा अभिजात असुन  कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथील स्तंभ, मराठी शिलालेख, संस्कृत भाषेनंतर झालेला मराठी भाषेचा उदय ,या जमेच्या बाजू असल्याचे सांगून मराठी भाषा ही श्रेष्ठ भाषा असल्याचे प्रतिपादन प्रा.राजीव कदम यानी केले.
      शहर पञकार संरक्षण समिती नळदुर्ग यांच्या वतीने कुसुमाग्रज जयंती तथा मराठी राजभाषा दिनानिमित्त परिसरातील  शिक्षक व प्राध्यापकांचा सत्कार भ करण्यात आला.यावेळी प्रा.कदम हे बोलत होते.
     पञकार संरक्षण समितीच्या वतीने मंगळवार  रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. आर.आर. कदम,  तर व्यासपिठावर पञकार  समितीचे अध्यक्ष शिवाजी नाईक ,सचिव भगवंत सुरवसे ' मुख्यध्यापक डि.एस.आलुरे,नगरसेवक विनायक अंहकारी  आदि उपस्थित होते.
       यावेळी मराठीचे शिक्षक  जी.एम. मोरखंडीकर, भैरवनाथ कानडे, खांडाळकर टि.डी , एल.बी.थिट्टे,  रवी भोसले, डि.एस. आलुरे, दत्ता राऊत, , सुनिल पुजारी, जुबेर चिश्ती, प्रा.कदम आर.आर, याचां पुष्पगुच्छ, शाल व पुस्तकांचा संच भेट देऊन सत्कार करण्यात आला. यांचा पुष्पगुच्छ, शाल व पुस्तकांचा संच देऊन सत्कार करण्यात येणार  आहे. नगरसेवक विनायक अहंकारी यासह सत्कार मुर्तीनी मराठी भाषेबद्दल विचार मांडले. कार्यक्रमास पञकार संरक्षण समितीचे सदस्य सचिन गायकवाड , इरफान काझी, श्रीनिवास भोसले , सतिस पिसे ,  रिपाईचे एस.के.गायकवाड , व  मन्सुर शेख , अरुण नाईक , प्रवीण राठोड पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक  समितीचे सचिव भगवंत सुरवसे  , सुञसंचलन पत्रकार संरक्षण समीतीचे जिल्हा अध्यक्ष दयानंद  काळुकें   यांनी  तर आभार समितीचे अध्यक्ष शिवाजी नाईक यांनी मानले.
 
Top