नळदुर्ग :- हिंदवी परिवाराचे संस्थापक तथा प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यास गुरूवार दि.२६ रोजी सायंकाळी भेट देऊन ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत हिंदवी परिवाराचे सदस्य, नळदुर्ग किल्ल्याचे अतिषय देखण्या पद्धतीने संगोपन, जतन करणाऱ्या युनिटी कंपनीचे संचालक कफील मौलवी उपस्थित होते.
नळदुर्ग सारख्या भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोठ्या असलेल्या किल्ल्याचे संगोपन करणे, सुधारणा करणे व त्यात सातत्य राखून ते सांभाळणे खूपच कठीण काम असल्याचे बोलून त्यांनी कफील मौलवी यांचे विशेष अभिनंदन केले. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतर असंख्य किल्ल्याचे संगोपन झाल्यास शिवप्रभुंची सेवा घडेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक वास्तू जतन,संवर्धन करताना होणारी ढवळाढवळ याबाबत पञकारांनी नाराजी व्यक्त करताच, पुरातत्व खात्याची आशी ढावळाढवळ आम्ही चांगल्या प्रकारे अनुभवली असल्याचे सांगत त्यांनी ऐतिहासिक वास्तूला धक्का लागेल याचा बागुलबुवा करून पुरातत्व खाते कशाप्रकारे अडथळे आणते हे आम्ही चांगलेच जाणतो आसे सांगताना त्यांनी रायगडावरील राजसदरेवर झालेल्या कार्यक्रमाचा अनुभव कथन करून पुरातत्त्व खात्याच्या चुकावर बोट ठेवले व लवकरच महाराष्ट्रातील असंख्य गडकिल्ले केंद्र सरकारच्या जोखडातून मुक्त होणार आसल्याचे सांगितले. एखाद्या धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखण्याएवढेच गडकिल्ल्यांचेही पावित्र्य राखणे गरजे असून ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी कचरा करणे, वास्तूवर काहीही लिहणे, दुष्कृत्य करणे हे टाळण्यासाठी लहानपणापासूनच चांगले संस्कार होणे गरजेचे आहे, विदेशात ऐतिहासिक दगड सुद्धा मनापासून जपले जातात आपल्याकडे माञ आजही आसे काही घडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
*नळदुर्ग किल्ल्याचे रूप पालटणा-या युनिटी मल्टिकाँन्स कंपनीच्या कार्यास सलाम करताना त्यांनी कफील मौलवी यांच्यावर स्तुती सुमने वाहीली तसेच सोलापूर येथिल संभाजी तलाव व ऐतिहासिक किल्ला संगोपनार्थ घेऊन असाच विकसित करावा आशी विनंती वजा हक्काची मागणी केली. नळदुर्ग किल्ल्याबाबत सांगताना त्यांनी काही वर्षापुर्वी येथील पाणी महालात कशाप्रकारे पक्ष्यांच्या विष्ठेची दुर्गंधी पसरलेली होती व आता त्याचा लवलेशही नाही असे पाणी महाल पाहिल्यानंतर गौरवपुर्ण उद्गार काढले*
महाराष्ट्रातील व दक्षिणेतील शिवप्रभूंचा वारसा सांगणारा किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवतांना, गडकिल्ल्यांची काळजी घेताना, जतन करताना, त्याठिकाणी व्याख्यान आयोजित केल्यानंतर आलेले अनुभवकथन श्री शेटे यांनी यावेळी केले. विश्वास नांगरे पाटील, चंद्रकांत गुडेवार यांच्यासारखे कार्यक्षम अधिकारी, बच्चु कडु सारखे तळमळीचे आमदार व असंख्य शिवप्रेमी आमच्या हिंदवी परिवाराच्या गड भ्रमती, गडावरील स्वच्छता मोहीम, व्याख्यानात सहभागी होतात. अतिषय शिस्तबद्ध, स्वंयस्फुर्तीने व शिवभक्तीने भारावून आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत असे श्री शेटे यांनी यावेळी सांगितले. तत्पुर्वी युनिटी कंपनीचे संचालक कफील मौलवी यांनी बारादरी येथे शिवरत्न शेटे यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी हिंदवी परिवाराचे अमोल मोहिते, संभाजी भोसले, अजय भगत, सतीश बुरडकर यांच्यासह पत्रकार, युनिटीचे कर्मचारी उपस्थित होते.