नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या नामफलकाचे उद्घाटन रविवार दि.१ जून रोजी करण्यात आले. भीम समर्थक टि.डी. गायकवाड यांनी बुद्ध विहारासठी दिलेल्या पितळी बुद्ध मुर्तीचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला.
दहिटणा ता.तुळजापूर येथे जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी स्वखर्चाने बुद्धविहार बांधून दिले आहे. विशेष बाब म्हणजे जि.प निवडणूकीच्या आधी धुरगुडे यांनी या ठिकाणी विहार बांधण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन स्वखर्चाने त्यांनी पुर्ण केले इथेच न थांबता आपल्या विकासनिधीतून या ठिकाणी भव्य बुद्ध विहाराची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे धुरगुडे यांनी सांगितले. सुमारे लाख रूपये खर्चुन स्वखर्चाने बांधलेल्या या बुद्ध विहाराची पाहणी करण्याबरोबरच धुरगुडे यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असंख्य अनुयायाशी चर्चा केली.
टी. डी. गायकवाड यांनी या बुद्धविहारासाठी दिलेल्या पितळी बुद्ध मुर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी राजाभाऊ ओव्हाळ, डी. टी. गायकवाड, आनंद पांडागळे, तानाजी कदम, दुर्वास बनसोडे, एस. के. गायकवाड, बाबासाहेब शितोळे, अरुण लोखंडे, संजय शितोळे, मारुती बनसोडे, बाबासाहेब मस्के, महादेव कांबळे, सोमनाथ गुड्डे, दत्ताञय बनसोडे, नागनाथ पाटील, बलभीम कदम, उमेश कांबळे. भरत वाघमारे, किरण बागडे, शहाजी कांबळे, अरविंद वाघमारे, स्वामीनाथ बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा दहिटणा, राजरत्न तरुण मंडळ, न्यु राजरत्न तरुण मंडळ यांच्यासह संयोजक व दहिटणा ग्रामस्थ उपस्थित होते.