तुळजापूर :- कांती ग्राम विकास संस्था संचलित महात्मा फुले आश्रमशाळा धारुर जि. बीड व विश्वनायक लोकसंसद वृत्त समुह मुंबई- पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा " छ्त्रपती शिवाजी महाराज नेशन पावर अवॉर्ड 2018" हा *पुरस्कार चिकुंद्रा ता. तुळजापूर येथील सहशिक्षक भैरवनाथ खंडू कानडे यांना दि(30) रोजी पुणे येथे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे येथील बालगंधर्व नाटय मंदिर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात कानडे यांना चित्रपट अभिनेत्री तथा अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका वर्षा उसगावकर राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे, माजी आमदार उल्हास ( दादा) पवार अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे सल्लागार अॅड. मंदार जोशी*, यांच्या शुभहस्ते तर लायन्स क्लबचे उपप्रांतपाल रमेशभाई शहा ,उदयोजक अतुल नाईक, सुजाता चिंता जेष्ठक़वी गझलकार ए. के. शेख संस्थेचे अध्यक्ष तथा संपादक सुरेश यादव यांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह, मानपत्र , मेडल देवून सदर पुरस्काराने गौरविण्यात आले. भैरवनाथ कानडे यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक अशा उलेखनीय कार्याची दखल घेवून संस्थेने त्यांची निवड केली आहे. याबददल त्यांचे आभिनंदन होत आहे.