नळदुर्ग : पाटीलतांडा (खुदावाडी) ता.तुळजापूर येथील हातभटटी आड्डयावर नळदुर्ग पोलिसांनी अचानक धाड मारुन 20 हजार रुपयाच्या मुद्देमालासह एका आरोपीस पोलिसानी अटक केली, तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. ही कारवाई गुरुवार रोजी सकाळी सात वाजता साहय्यक पोलिस निरीक्षक संजीव मिरकले यानी केली.
बाळु राम पवार (रा. पाटील तांडा, ता. तुळजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विकास गोविंद राठोड (रा. सदर) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवार दि. 5 जुलै रोजी सकाळी सात वाजता नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव मिरकले व त्यांच्या सहका-यानी पाटील तांडा येथे धाड टाकून 400 लीटर रसायनने भरलेली लोखंडी बॉरल, 25 लीटर तयार हातभटी गावठी दारु असे मिळून 20 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसानी हस्तगत केले. पुढील तपास पो.कॉ. दत्ता शिंदे, नितीन सुरवसे हे करीत आहेत.