नळदुर्ग : शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून लाभार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य गुळहळळी (ता. तुळजापूर) या गावाने कौतुकास्पद केले असून भविष्यात शासनाच्या येणा-या योजना यशस्वीपणे राबवून गावकुसाचा विकास साधावा, असे आवाहन केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय सचिव फरीदा नाईक यांनी गाव भेटीप्रसंगी केले.
केंद्रीय ग्रामस्वराज अभियानाच्या विशेष पथकाने गुळहळळी (ता. तुळजापूर) या गावास बुधवार रोजी भेट देवून केंद्र शासनाच्या राबविलेल्या विविध योजनांची व लाभार्थ्यांची प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून माहिती जाणून घेतली. गुळहळळी गावची कुटुंब संख्या 230 असून शंभर टक्के चुल मुक्तीकडे गावाची वाटचाल सुरु आहे. तर शंभर टक्के वीज असलेले गाव आहे. या  गावात पंतप्रधान उज्वला गॅसयोजनेंतर्गत 55 लाभार्थी कुटुंबांना गॅसचे वाटप, गावातील 180 व्यक्तींचे बँकेत खाते उघडण्यात आले. तर हर घर बिजली अंतर्गत 11 लाभार्थ्यांना वीज कनेक्शन देण्यात आले तसेच पंतप्रधान जीवन ज्योती अंतर्गत विमा 70 जणांचा उतरविण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 39 कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला.
पथकातील केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय सचिव फरीदा नाईकसहाय्यक अप्पर सचिव जितेंद्र कुमार यांच्या समवेत पं.स. गटविकास अधिकारी ढवळशंख बी.आर., सहायक गटविकास अधिकारी तायडे सुरेशविस्ताराधिकारी भांगे के.बी., राऊत एसएसआदींची उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधान उज्वला योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅसचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
शासनाच्या विविध योजना राबवल्यामुळे सरपंच मिरा सचिन घोडके यांचे या पथकाने कौतुक केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन घोडकेग्रामसेवक बी जी ढवळे, उपसरपंच ख्वाजाभाई पटेल, ग्रा.पं. सदस्य वैशाली गायकवाड, विजयाबाई घोडके, केशव हालकंबे, विकास चव्हाण, पोलीस पाटील आकाश हंजगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडीत निकम, अंगणवाडी सेविका सुमन हालकंबे, दयाबाई गायकवाड, वाल्मिक पांढरे यांच्यासह लाभार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top