नळदुर्ग :
शहरातील जुन्या भागात पाणीपुरवठा करण्यात येणा-या हुतात्मा निलय्या स्वामी
उदयानातील मुख्य जलवाहिनीत मंगळवार रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने शौच केल्याने
शहरवासियात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बुधवार रोजी दिवसभर सोशल मिडीयावरुन अनेकानी
या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला. शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा व
जिवीताचा प्रश्न असल्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याची गरज
आहे.
काही दिवसापूर्वी
व्यंकटेश नगर येथील जलवाहिनी अज्ञात समाजकंटकाकडून फोडण्यात आली होती. असे कृत्य
करणाऱ्या अज्ञात समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी पाणीपुरवठा विभागस कर्मचा-यांनी
पोलिसात तक्रार दिली आहे. माञ या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान,
बुधवारी पाणीपुरवठयाचे कर्मचारी जनार्धन कांबळे, फुलचंद सुरवसे, अंबादास व्हगाडे,
विष्णू भोई, मुनीर शेख, योगेश बनसोडे, संजय कांबळे, संदीपान कांबळे, विकास कांबळे,
दिपक कौरव आदी कर्मचा-यांनी पाण्याचे दोन लाख लिटर क्षमता असलेल्या स्टोरेज टँकची
स्वच्छता केली. तब्बल सात तास कर्मचारी स्वच्छता करीत होते. घटनास्थळी पाणीपुरवठा
सभापती महालिंग स्वामी यानी भेट देवून पाहणी केली.
दरम्यान, पाणीपुरवठा
करणा-या हुतात्मा निलय्या स्वामी उदयानात भविष्यात अनुचित घटना घडू नये यासाठी
न.प. प्रशासनाने कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी
नागरिकांतुन केली जात आहे. त्याचबरोबर स्वामी उदयानातुन गेलेला रस्ता तात्काळ बंद
करण्याची मागणी होत आहे.