तुळजापूर : सलगरा दिवटी (ता. तुळजापूर) येथील शेतक-याच्या घरास शाॅटसर्कीटमुळे आचानक आग लागुन संसारोपयोगी साहित्यासह आन्न धान्य जळून खाक झाले 
      तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील शेतकरी किसन सखाराम केदार यांच्या घरास अचानक आग लागून  धान्य कपडे, टी व्हि , फ्रीज सह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
      याप्रकरणी गाव कामगार तलाठी पवार यांनी पंचानामा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मंगळवार रोजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन शेतकरी किसन केदार यांचे सांत्वन केले. यावेळी मदत म्हणुन     धुरगुडे यांच्या वतीने ज्वारी, तांदुळ किराणा साहित्य देण्यात आले...

 
Top