नळदुर्ग : धुळे जिल्हयात भिक्षा मागणा-या पाच जणाची निर्घुण हत्या करणा-या गावगुंडावर कडक कारवाई करुन त्याना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन नळदुर्ग पोलिसाना रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया व मानवी हक्क नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यानी
गुरुवार रोजी दिले.
मुले पळविणारी टोळीच्या आफवेने धुळे जिल्ह्यातील राईनपाडा ता.साक्री येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील दादाराव भोसले ,भारत भोसले, राजु भोसले ,भारत मालवे, अगन हिंगोले सर्व राहणार सोलापुर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यास ग्रामपंचायतच्या
कार्यालयामध्ये डांबुन दगड काट्याने बेदम मारहान करुन निघृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ शासनाने आरोपीवर कठोर कारवाई करावी यामागणीसाठी रिपाइं व मानवी हक्क संरक्षण संघाच्या वतिने पोलीसाना निवेदन देण्यात आले. तसेच याघटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावुन जाहिर निषेध केला.
याप्रसंगी अरुण लोखंडे , दुर्वास बनसोडे , शाम नागिले , बाबासाहेब बनसोडे , अशोक अलकुंटे यासह कार्यकर्त उपस्थित होते तर जळकोट , येडोळा , नळदुर्ग या गावासह परिसरातील डवरी समा जातील नागरिक उपस्थित होते.