उस्मानाबाद :- ग्रामीण
भागातील आरोग्य विभागाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा
परिषदेच्या आरोग्य विभागाला 30 कोटी 83 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे
रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असून हा निधी मंजूर करण्यासाठी
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई
पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्यावत नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी मंजूर
झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी
समुद्रवाणी (ता.उस्मानाबाद) येथे चार कोटी 68 लाख 62 हजार रुपये, सोनारी (ता.परंडा) येथे पाच कोटी 60 लाख 47
हजार रुपये, कोंड (ता.उस्मानाबाद) येथे
चार कोटी 95 लाख रुपये, येरमाळा (ता.कळंब) येथे चार कोटी 95 लाख रुपयाचा निधी
मंजूर झाला आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी अद्यावत
निवासस्थानासाठी मुळज(ता.उमरगा) येथे एक
कोटी 78 लाख 93 हजार रुपये, सलगरा(ता.तुळजापूर) येथे दोन कोटी 16 लाख 21 हजार
रुपये, ईट(ता.भुम) येथे एक कोटी 72 लाख 26 हजार रुपये, पाडोळी(ता.उस्मानाबाद) येथे
दोन कोटी 16 लाख 21 हजार रुपये तर ढोकी
(ता.उस्मानाबाद) येथे दोन कोटी 80 लाख 37 हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळण्यास मोठी
मदत होणार आहे.