उस्मानाबाद :- सन 2012 च्या पायाभुत सर्वेक्षणाप्रमाणे स्वच्छ
भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत दिनांक 30 डिसेंबर
2017 रोजी उस्मानाबाद जिल्हा हा 100 टक्के हागणदारी मुक्त
घोषीत करण्यात आला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व हागणदारी मुक्त
ग्रामपंचायतींची तपासणी शासन नियुक्त स्वयंसेवी संस्थेमार्फत टप्पा-2 अंतर्गत पुर्ण करण्यात आली असून सदरील तपासणीमध्ये जिल्ह्यातील सर्व
ग्रामपंचायती या पात्र ठरलेल्या आहेत. या उपक्रमामुळे उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाड्यातील
100 टक्के ग्रामपंचायती तपासणी करणारा पहिला जिल्हा ठरलेला
आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत उस्मानाबाद
जिल्ह्याने हागणदारीमुक्त ग्रामपंचायती होण्याकरीता विविध नाविन्यपुर्ण उपक्रम
राबविून सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणाप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा
दि. 30 डिसेंबर 2017 रोजी हागणदारी
मुक्त केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची तपासणी यशस्वीरित्या
पुर्ण करणे हे आव्हानात्मक कार्य पुर्ण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेने दि. 23
जून 2018 रोजी यशस्वीरित्या पुर्ण केलेली आहे.
महाराष्ट्र शासन नियुक्त राज्यातील विविध जिल्ह्यातील 8 (आठ) मुख्य संसाधन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तपासणी
दि. 22 जून 2018 रोजी संपन्न झालेली
असून या तपासणीमध्ये सर्व ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या आहेत. या उपक्रमात
उस्मानाबाद जिल्ह्याने मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे काम यशस्वीरित्या
पुर्ण करण्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी
वारंवार बैठका व सुयोग्य नियोजनाच्या आधारे हे उद्दिष्ठ साध्य केले आहे. या कामी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.स्व) श्री मधुकर देशमुख व
त्यांचे सर्व कर्मचारी, सर्व गट विकास अधिकारी व त्यांचे
अधिनस्त सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांनी सदरील तपासणी यशस्वी होण्याकरीता विशेष
प्रयत्न केलेले आहेत.
सन 2012 च्या सर्वेप्रमाणे हागणदारी मुक्त करणेकामी व त्या प्रमाणे सर्व
गावे संस्थेकडून तपासून घेणे कामी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांना सोबत
घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,
उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी मोहीम काळात व त्यापुढे सतत प्रयत्न केले आहेत.
या कामाबद्दल त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ,
पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन उर्वरीत सर्वेबाहेरील कामाबाबत
मार्गदर्शन केले व सूचना दिल्या.