औरंगाबाद :- राष्ट्रीय बंजारा मिशनच्या केंद्रीय कमिटी व महाराष्ट्र प्रदेश कमिटीची रविवार दि. 5 ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीत बंजारा समाजाला एस.टी. चे आरक्षण मिळावे याबाबत नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.  सदरील बैठकीस राष्ट्रीय बंजारा मिशनचे विविध राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय सचिव गोविंद राठोड व राष्ट्रीय प्रसिध्दी प्रमुख वसंत जाधव यांनी केले आहे.  
 
Top