नळदुर्ग :- प्रतिवर्षाप्रमाणे नळदुर्ग येथील आदर्श शिक्षक श्री. वसंतराव अहंकारी यांच्या निवासस्थानी दि. २१ जूलै ते २७ जूलै या दरम्यान " भागवत कथा " सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे..
भागवत सप्ताहाचे यंदाचे ४५ वे वर्ष आहे..वे.शा.सं. श्रीराम जोशी यांच्या अमृतवाणीने भागवत कथा सांगितली जाते.. रोज सकाळी ६ ते ११ संस्कृतमधून संहीता वाचन व दुपारी ३ ते ६ मराठीतून कथा सांगितली जाते.. यामध्ये श्रीकृष्ण सुदामा भेटीचे अख्यान, वामन पूजा, गोवर्धन कथा सांगितली जाते..गूरूपौर्णीमेच्या दिवशी समाप्ती असून यावेळी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे..
या भागवत सप्ताहासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे अव्हान श्री.बाबूराव अहंकारी, वसंतराव अहंकारी,बळवंतराव अहंकारी, विकास अहंकारी, वैभव अहंकारी, योगेश अहंकारी व नळदुर्गचे नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले आहे.