नळदुर्ग :- शहरात गेल्यावर्षी ऐन पावसाळ्यात डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या कामाचे पहिल्या पावसातच तीन तेरा झाले आहे. ई निविदा प्रक्रिया टाळण्यासाठी एका कामाचे तीन तुकडे पाडून व रस्त्याचा काही भाग वगळून हास्यास्पद कामामुळे वादग्रस्त ठरलेल्या, त्यानंतरही डांबरीकरणानंतर एका महिण्यातच रस्ता उखडल्यामुळे चौफेर टीका झालेल्या रस्त्याचे शुक्लकास्ट वर्षभरानंतरही संपताना दिसत नाही. पुन्हा एकदा पालिकेची, तत्कालीन सत्ताधारी व आजचे सत्ताधारी यांच्या आब्रूचे धिंडवडे वेशीवर टांगणा-या या निकृष्ट रस्त्यावर अंसख्य खड्डे पडल्यामूळे या कामाची चौकशी करण्यात यावी आशी मागणी होत आहे. हे सर्व कमी होते की काय एका टेलिकाँम कंपनीने वायर टाकण्यासाठी बाकी रस्त्याचीही खोदून वाट लावली आहे.
       रस्ते विकासाकरीता आलेल्या लाखो रूपयाच्या निधीचे वाटप करून ई टेंडर पासुन बचावा करीता नळदुर्ग नगरपरीषदेने कामाचे तुकडे केले जो बस स्थानक ते किल्ला गेट एकच रस्ता असताना त्याचे तिन तुकडे करून ई निविदेपासून बचाव करत सदर कामाचे  हवे तसे तुकडे पाडून वाटप करण्यात आले होते. आशा स्वरूपात झाले कामाचे वाटप १) किल्ला गेट ते चावडी चौक २) चावडी चौक ते भवानी चौक ३) शास्ञी चौक ते बसस्थानक आशाप्रकारे एकाच रस्त्याचे तीन भागात तुकडे करून कामाचे अंदाजपञक पाच लाखाच्या आत  बनवले व ई टेंडर पासुन बचाव करून तत्कालिन सत्ताधा-यांनी काम वाटुन घेतले.  यापैकी काहींनी काम केले तर उर्वरीत काम जून २०१७ मध्ये पावसाळ्यात उरकले. हे काम करत काम वाटणीमध्ये आलेले जवळपास चाळीस फुटाचा रस्ता बनवायचे राहून गेले होते. भवानी चौक ते शास्ञी चौक (जय भावानी कट्टा ते प्रयाग निवास ) हा अंदाजे ३० फुट रूंद ३०० फुट लांब रस्ता बनवायचा राहिला. आता हा रस्ता नक्की कोणत्या गुत्तेदाराने बनवायचा हा प्रश्न शहरवासीय विचारत होते. सोशल मिडीयातूनही याप्रकरणी 'अदृष्य रस्ता'  नावाने पालिका, अभियंता व कंञाटदारावर टीका झाली होती.
     आँगस्ट २०१७ मध्ये म्हणजे दोनच महिन्यात पावसामुळे हा रस्ता उखाडला होता. वर्तमान पञातही बातमी आली. पुन्हा टिकेनंतर पालिकेने थातुरमातूर डागडुजी करून वेळ मारून नेली. पञकार संरक्षण समितीने याबाबत पालिकेत निवेदन देऊन नव्याने काम करावे व  कंञाटदारावर कारवाईची मागणी केली होती. माञ आज घडीला या रस्त्याची आवस्था अत्यंत खराब झालिली असून शहरात या रस्त्यावरून टिकेची झोड उठली आहे. काही नागरिक कंञाटदारास काळ्या यादीत टाका,  नगरआभियंता व संबंधित आधिका-यास बडतर्फ करावे या मागणीसाठी जिल्हाधिका-यांना  निवेदन देणार आहेत.

 
Top