तुळजापूर :- माहिती अधिकारात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी  तालुका कृषी अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 
     निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्याकडून माहिती अधिकारात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मौजे अणदूर येथील स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2016-17 अंतर्गत खासदार निधीतून करंजेनाला व नागणखोरी अशा दोन ठिकाणी नालाखोलीकरण करण्याचे आदेश दि. 4/11/2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कृषी विभागास देण्यात आलेले होते. परंतु कृषी कार्यालयामार्फत प्राप्त माहिती प्रमाणे वरील मंजूर दोन्ही ठिकाणाऐवजी अन्य ठिकाणचे अंदाजपत्रक तालुका कृषी कार्यालय तुळजापूर यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्याचे निवेदनात नमूद करुन नालाखोलीकरणासाठी सुचवण्यात आलेल्या स्थळे बदलण्यात येवून लोकसहभागाच्या कामाचेच अंदाजपत्रक तयार करुन फसवणूक केल्याचे  निर्दशनास येते.  

 
Top