नळदुर्ग : बेकायदेशीर हातभट्टी दारु विक्रेत्यास आचानक संतप्त महिला वर्ग गराडा घालताच संबधित दारु विक्रेता मुद्देमाल टाकुन पळ काढल्याची घटना
फुलवाडी तांडा ता.तुळजापूर येथे शनिवार दि.७ जुलै रोजी
सकाळी ११.३० वाजता घडली.याप्रकरणी एका आरोपीविरुधद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलवाडी
तांडा येथिल जि.प.शाळेच्या पाठीमागे
आरोपी धनु गणपती जाधव यांच्या शेतातील कोठयासमोर तयार
गावठी हातभट्टी दारु एका रबरी ट्युबमध्ये २० लिटर,किमंत ८०० रुपये मुद्दे माल पोलिसानी हस्तगत केले
. यातील आरोपी धनु जाधव हा गावठी हातभट्टी दारु विक्री करत असल्याची माहिती येथिल
महिला मंडळास मिळताच महिलांनी दारु आड्यावर जाऊन घेराव घालुन कोट्यातुन दारुने भरलेली रबरी ट्युब मिळुन आली
.नळदुर्ग पोलीसाना
कळविताच पोलीस निरिक्षक वारे सह पोलीस पथकाने घटना स्थळी भेट देवु पंचनामा करुन मुद्देमाल
हस्तगत केला आहे याप्रसंगी उपसरपंच सुभाष कुताडे सह महिलावर्ग उपस्थित होते.
.दारु बंदी मोहिमेमुळे अवैद्य दारु विक्रेत्याचे धाबे दणाणले आहे
एस.एस सोनवणे यानी फिर्याद
दिल्यावरुन आरोपी विरुध्द गुन्हा
दाखल करुन पुढील तपास पो.काँ.के.आर.
शेवाळे करीत आहेत.