तुळजापूर : अशुद्ध पाणी व अस्वच्छ
परिसर हे रोगराई पसरण्याचे मुख्य कारण असल्याचे ओळखून शासनाने
सन 2000-2001 पासून संत गाडगेबाबा
ग्राम स्वच्छता अभियान
राबविण्यास सुरुवात
केली. या अभियानास लोकसहभागाने लोकचळवळीचे
स्वरूप प्राप्त झाले. त्यानुसार तामलवाडी
(ता. तुळजापूर) या ठिकाणी सरपंच ज्ञानेश्वर
माळी यांच्या
नेतृत्वाखाली गावातील युवक वर्ग गेल्या
आठवडयाभरापासून दररोज एक तास
गावामध्ये स्वच्छता मोहीम उत्साहाने राबवित आहेत.
तुळजापूर तालुक्यातील
तामलवाडी गावातील शिवरत्न नगर,
विजयनगर, महामार्गाच्या दुर्तफा
कडील सर्व्हीस रोड,
आरोग्य उपकेंद्र,
मंदीर परिसर,
ग्रामपंचायत, शाळा,
पोलीस ठाणे आदी ठिकाणी
युवकाकडून स्वच्छता मोहीम
राबविण्यात येत
आहे. या मोहिमेला सुरुवातीस अल्प
प्रतिसाद मिळत
होता. परंतु दिवसेंदिवस या मोहिमेत युवक वर्ग सक्रिय सहभाग नोंदवित असून स्वच्छता
मोहिमेस उत्स्फुर्त
प्रतिसाद मिळत आहे.
या मोहिमेत नवीन
सदस्यांचे पुष्प
देऊन स्वागत केले
जात आहे. सरपंच ज्ञानेश्वर
माळी व त्यांचे सहकारी
हरि गायकवाड, एकनाथ
गायकवाड, प्रभाकर
लोंढे, महादेव
लोंढे, गोपाळ
पाटील, किशोर
बनसोडे, अतुल
जाधव, रामलिंग
जाधव आदी सदस्यांचे ग्रामस्थामधून
अभिनंदन करुन कौतुक केले
जात आहे.
या मोहिमेला ग्रामस्थ
प्रोत्साहनपर प्रतिसाद देत
असून स्वच्छतेसाठी
लागणारे साहित्य
स्वखुशीने पुरवत आहेत.
येथील ग्रामपंचायत सदस्या
सौ. संजना गुरव,
सरपंच ज्ञानेश्वर
माळी यांनी
सुरू केलेल्या
या स्वच्छता चळवळीस प्रतिसाद
देत त्यांना हातमोजे,
मास्क, खराटे आदी
साहित्य पुरविण्यात
आले. या मोहिमेसाठी व गावातील
लोकांच्या सोयीसाठी
ग्रामपंचायतीच्या वतीने
50 डस्टबीनची खरेदी
करण्यात आली असून
येत्या 15 दिवसात कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने
घंटागाडी खरेदी करण्यात येणार
असल्याची माहिती
सरपंच माळी यांनी
दिली. एकंदरीत युवकांच्या श्रमदानाने
तामलवाडी गाव आरोग्य संपन्न व स्वच्छतेच्या
दिशेने वाटचाल
करीत आहे.