नळदुर्ग :- राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर आगाराने शनिवार रोजीपासून नव्याने
नळदुर्ग ते गुळहळळी (ता. तुळजापूर) या गावास एसटी बस सुरु केल्याने शालेय व महाविदयालयीन
विदयार्थ्यांची व ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय झाल्याने प्रवाशी वर्गातुन एसटी बसचे
स्वागत होत आहे.
नळदुर्ग
एसटी बसस्थानकातून तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी गावास बस सुरु करण्यात आले असून दिवसातुन
तीन फे-या या बसचे होणार आहे. त्यामुळे विदयार्थ्यांसह प्रवाशांची सोय झाली आहे. विशेषत:
खुप दिवसापासून बस अभावी विदयार्थ्यांची गैरसोय होत होती. पुर्वी सकाळी नऊची बस गुळहळ्ळीकडे
जाण्यास होती. मात्र दुपारच्या
एसटी बसची सोय नव्हती.
या गाडी मुळे
मौजे-गुळहळ्ळीला नळदुर्ग
वरुन शनिवार दि. 7 जुलैपासुन दिवसभरात तीन फेऱ्या
होत आहेत. ही बस सकाळी 9 वाजता नळदुर्ग-वागदरी-दहिटना-गुळहळ्ळी,
दुपारी 4 वाजता नळदुर्ग-अणदूर-वागदरी-दहिटना-गुळहळ्ळी व संध्याकाळी साडे सात वाजता नळदुर्ग-अणदूर-खुदावाडी-गुजनूर-शहापूर-दहिटना-गुळहळ्ळी
आदी मार्गाने बस धावणार आहे.
या नूतन एसटी बसचे गावातील ग्रामस्थांनी पूजा
केली. यावेळी उमेश
चव्हाण, नवनाथ पटणे, निगुशा
बिराजदार, विठ्ठल पाटील, गुडू
पटेल, वाहक, चालक
व ग्रामस्थ उपस्थित
होते.