तुळजापूर : उमरगा चिवरी ता. तुळजापूर येथील अंगणवाडीत कुपोषीत बालकासाठी एकात्मीक
बाल विकास प्रकल्पाच्या वतीने व्हि सी डी सि केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. केंद्राच्या
माध्यमातुन कुपोषित बालकासाठी सकस आहार व औषध उपचार केले जात असुन यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. त्याना रोज पोषण आहार
व औषध देण्यात येणार आहे. यामुळे आता अंगणवाडीतील
दोन कुपोषित बालके सुदृढ होण्यास मदत होणार आहे
यावेळी सरपंच स्वाती लिंगाप्पा दुधभाते, उपसरपंच
आण्णाराव दत्तु कदम, ग्रामसेवक एस.बी. घोडके, अंगणवाडी पर्यवेक्षिका एस.डी. दलभजन,
अंगणवाडी कार्यकर्त्या गोकर्णा माने, वनिता पवार, महानंदा बनसोडे, अनिता पवार, आशा
कार्यकर्ती अनिता भोसले आदीजण उपस्थित होते. गावातील मिजबा अल्लाउद्दीन पटेल व तज्जीला
मोशिन शेख सह पालक उपस्थित होते.